अध्यक्ष पिचड, मग गायकरांची बदनामी का? - अजित पवार

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारसभेत आले असता त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.
Ajit Pawar
Ajit PawarSakal
Summary

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारसभेत आले असता त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

अकोले - अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष मधुकरराव पिचड होते, मग सीताराम गायकरांनाच टार्गेट कसे करता? हा कारखाना वाचवायचा असेल व बारामतीसारखा चालवायचा असेल, तर समृद्धी पॅनलला निवडून द्या. अगस्तीमध्ये आमूलाग्र बदल घडवून दाखवू, असे आश्वासन देतानाच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याच्या सत्तांतराबाबत भाष्य केले. ते म्हणाले, की कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आले नाही. आत्ताच माईकची खेचाखेची व कागदाची सारवासारव होते आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असताना मंत्रिमंडळाची स्थापना नाही, मग तुमच्या सत्तेचा उपयोग काय?

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारसभेत आले असता त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. अकोल्यातील विठ्ठल लॉन्समध्ये शेतकरी समृद्धी मंडळाची प्रचारसभा झाली. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. किरण लहामटे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सभेला सुरवात झाली.

पवार म्हणाले, की अल्कोहोल, इथेनॉलनिर्मिती करून डिझेल-पेट्रोलला पर्याय दिला तरच अगस्ती कर्जमुक्त होईल. शेतकरी समृद्धी मंडळ जुन्या-नव्याचा मेळ घालून निवडणुकीत उतरले आहे. ते चांगले काम करतील असे मी तुम्हाला आश्‍वासित करतो. सोमेश्वर कारखाना बंद पडला होता, तो ऊर्जितावस्थेत आणला. मला तुम्हाला फसवायचे नाही. जातीपाती, नातीगोती यांचा विचार न करता ही निवडणूक तुमच्या संसाराशी निगडित आहे, याचे भान ठेवून मतदान करा. यापुढेही मला तुमच्याकडे जिल्हा परिषद, आमदार, खासदारकीसाठी यायचे आहे. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो.

पिचड साहेबांनी या वयात मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. पतसंस्थांमध्ये खरेच भ्रष्टाचार झाला असेल, तर चौकशी होण्यास हरकत नाही. मात्र, काही नसताना चौकशी, ही काय मोगलाई लागली आहे का? सगळ्या संस्थांमध्ये पिचड बाप-लेकच का? अगस्तीत तुम्ही अध्यक्ष असताना बदनामी सीताराम गायकर यांची करता, हे योग्य नाही. अगस्तीतून गायकरांना काढले, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. अशोक भांगरे यांनी, अगस्तीचा अध्यक्ष आदिवासी नव्हे तर बहुजनांचा असावा, असे मत व्यक्त केले. डॉ. अजित नवले यांनी, चाळीस वर्षांची सत्ता जनतेने उलथवून टाकली. परिवर्तनाच्या मंडळीने पिचड यांना पाठिंबा देऊन भ्रष्टाचाराबाबत हास्यास्पद विधान केले याचे आश्चर्य वाटल्याचे सांगितले.

गायकर म्हणाले, की अगस्ती व माझी बदनामी करण्याचे काम दशरथ सावंत, बी. जे. देशमुख करीत आहेत. डिस्टिलरीला विरोध करायचा, मात्र दुसरीकडे टँकरने दारू पचवायची. शरद पवार, अजितदादा यांनी तालुक्याच्या विकासाला पाठबळ दिले. पिचड पिता-पुत्र पतसंस्थांची चौकशी करण्यासाठी सरसावले. मात्र, तुम्हाला गाड्या-घोड्या घेण्यासाठी पतसंस्थांनी कर्ज दिले हे विसरले का, असा सवाल केला.

स्वागत वसंत मनकर यांनी केले. प्रास्ताविक मधुकर नवले यांनी केले.

मी एकवचनी : डॉ. लहामटे

पिचड मला नालायक आमदार आहे असे म्हणतात, मी एकपत्नी, एकवचनी श्रीरामाचा भक्त आहे. मी अजितदादांनाही सांगतो, की निवडणुकीत भगवा घातला. सरकार आले-गेले, भगवा काढला नाही. यापुढेही काढणार नाही. मला दादांनी ५०० कोटी दिले. मात्र, देवीचा घाट, औद्योगिक वसाहत, उपजिल्हा रुग्णालय व मुळा परिसरात अजून एक धरण होण्यासाठी निधी मिळवून द्यावा, असे आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com