
-राजू नरवडे
संगमनेर: वय फक्त एक संख्या असते, जोपर्यंत तुम्ही जगण्यावर प्रेम करता. हे वाक्य संगमनेरमधील बाजीराव कानवडे (वय ७८) व त्यांच्या पत्नी हिराबाई कानवडे (वय ६८) यांचे जीवन अगदी जगून दाखवतंय. शिक्षकी पेशातून सेवानिवृत्तीनंतरचा वेळ शांतपणे न घालवता, सायकलचा हँडल पकडत एक वेगळी वाट निवडली आरोग्य, आनंद आणि समाजप्रेरणेची.