esakal | दगडाला दूधाचा अभिषेक घालून पंतप्रधान मोदी सरकारचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation of milk producing farmers on Kolhar Ghoti state highway in Ahmednagar district

नगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुधाला 30 रुपये भाव द्या, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

दगडाला दूधाचा अभिषेक घालून पंतप्रधान मोदी सरकारचा निषेध

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : नगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुधाला 30 रुपये भाव द्या, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र व राज्य सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध केला आहे.
डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे, सुरेश गडाख, सचिन शेटे, दिलीप शेणकर, सोमनाथ नवले, लक्ष्मण नवले, चंद्रकांत नेहे यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा यामध्ये निषेध केला जाणार आहे. 

केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या. दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करावे, या प्रमुख मागण्यासाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्याचे केले नियोजन. कोल्हापूर व सांगलीतही असे आंदोलन केले जात आहे, असे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दुध ऊत्पादक संघर्ष समीतीच्या वतीने कोल्हार घोटी राज्य मार्गावर दूध ओतून आंदोलन करण्यात आले. भीक नको... द्या घामाचा दाम... म्हणत आज अकोलेतुन दुध ऊत्पादक संघर्ष समीतीच्या वतीने दूध ओतून कोल्हार घोटी राज्य मार्गावर केले. यावेळी माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री दशरथ सावंत (शेतकरी नेते), रिपाईचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे, अगस्तीचे संचालक व शिवसेना नेते  महेशराव नवले, संभाजी ब्रिगेडचे विभागीय सचिव डॉ. संदीपराव कडलग, भाकपचे नेते शांताराम वाळुंज, संभाजी ब्रिगेडचे शिवश्री सोमनाथराव नवले, नगरसेवक सचिन शेटे, शुभम आंबरे, सुशांत आरोटे, स्वप्निल नवले, सुभाष बगनर, सचिन ताजने यांच्यासह सर्व शेतकरी व दुध ऊत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image