
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी पाथर्डी तालुका कॉंग्रेसतर्फे (स्व.) वसंतराव नाईक चौकात गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
पाथर्डी (अहमदनगर) : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी पाथर्डी तालुका कॉंग्रेसतर्फे (स्व.) वसंतराव नाईक चौकात गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
हे ही वाचा : जागतिक दिव्यांग दिन साधेपणाने साजरा
कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नासीर शेख, जालिंदर काटे, नवाब शेख, रवींद्र पालवे, सुभाष कोलते, अकबर पटेल, दत्ता पाठक, पवन गरड, दिगंबर सोलट, युसूफ खान, सरफराज चौधरी, दिगंबर बोंडगे, गणेश दिनकर, कयूम सय्यद, गणेश दहिफळे, अनिल दिनकर, प्रमोद मोरे, दत्ता मोरे उपस्थित होते.
शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष अमोल पाठक यांनी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. जालिंदर काटे यांनी प्रास्ताविक केले तर सुभाष कोलते यांनी आभार मानले.
संपादन - सुस्मिता वडतिले