esakal | जागतिक दिव्यांग दिन साधेपणाने साजरा
sakal

बोलून बातमी शोधा

World Disability Day was celebrated in a very simple manner at Shrirampur

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समिती कार्यालयात जागतिक दिव्यांग दिन साधेपणाने साजरा करण्यात आला.

जागतिक दिव्यांग दिन साधेपणाने साजरा

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समिती कार्यालयात जागतिक दिव्यांग दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. सभापती संगीता शिंदे, सदस्य डॉ. वंदना मुरकुटे, अरुण पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, ज्ञानेश्वर शेंडगे उपस्थित होते.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते हेलन केलर आणि लुईस ब्रेल यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. पंचायत समितीतर्फे तालुक्‍यातील विविध ठिकाणच्या नऊ दिव्यांगांच्या पालकांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
 
वर्षा दातीर यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व विशद करून लुईस ब्रेल आणि हेलन केलर यांच्या कार्याची माहिती दिली. दिव्यांगांना सहानुभूती नको, तर संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागासह गोपाळ सपकार यांनी परिश्रम घेतले. 

संपादन - सुस्मिता वडतिले