
हुरीचे तालुका कृषी अधिकारी ठोकळ यांनी अपमानास्पद वागणूक देत सोमनाथ बाचकर यांना धमकावल्याच्या प्रकार निषेधार्ह आहे. या असंस्कृत अधिकाऱ्याविरुद्ध त्वरित कारवाई करावी.
संगमनेर ः राहुरी तालुक्यातील कृषी अधिकारी महेंद्र ठोकळ यांनी कृषी सहायक संघटनेचे माजी राज्याध्यक्ष व विद्यमान राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ भास्कर यांना शिवीगाळ केली.
या घटनेचा निषेध करत येथील कृषी सहायक संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले. तसे निवेदन नुकतेच उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांना देण्यात आले.
हेही वाचा - नवऱ्याने मारलं, पावसाने झोडपलं, लंकेंवर झावरेंची टीका
निवेदनात म्हटले आहे, की राहुरीचे तालुका कृषी अधिकारी ठोकळ यांनी अपमानास्पद वागणूक देत सोमनाथ बाचकर यांना धमकावल्याच्या प्रकार निषेधार्ह आहे. या असंस्कृत अधिकाऱ्याविरुद्ध त्वरित कारवाई करावी.
कृषी सहायक संघटनेच्या कार्याध्यक्षा नंदा नेहे, जिल्हा प्रतिनिधी सुरेश घोलप, नारायण घुले, शारू जाधव, अर्चना शिंदे, अनिता पांडे, अर्चना आंबरे, अर्चना नवले, रेहाना शेख, अपर्णा गडाख, राजू साबळे, योगेश शेंडे, हिरालाल सुर्वे, श्यामल तळोले, लक्ष्मण जुंधारे, ज्योती लांडगे, संकेत देशमुख, संगीता सातपुते, सुनीता गोसावी, शीतल जाधव, सुमीत गोसावी, दिलीप हारदे आदी उपस्थित होते.