
आमदार नीलेश लंके राज्यात आपली फार वट असल्याचे सांगतात. मात्र, तालुक्याची अवस्था काय झालीय हे सर्वांना माहिती आहे. राज्याला दिशा द्यायचे सोडा, आधी तालुक्याचे बघा, अशी कोपरखळी सुजित झावरे यांनी मारली आहे.
टाकळी ढोकेश्वर : राज्यात आमचे खूप वजन आहे असे म्हणता ना, मग पारनेर तालुक्यात मुसळधार पावसाने उभी पिके जमिनदोस्त झाली आहेत. ते पंचनामे करा, नुकसान द्या. राज्याला दिशा देण्याआधी आधी तालुक्याचे प्रश्न सोडवा. नव-यानं मारलं, पावसानं झोपडलं अशी तालुक्याची आज अवस्था झाली आहे, तिकडे लक्ष द्या, अशी कोपरखळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न मारली.
पळसपूर (ता.पारनेर) येथील झावरे यांच्या माध्यमातून
जिल्हा परिषदेतून निधी उपलब्ध होऊन गव्हाळी बंधारा बांधण्यात आला. त्यातील पाण्याचे जलपूजन झावरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - महिला प्रसूतीला येताच नर्स बसली लपून
झावरे म्हणाले, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय सोडून इतरही समाजउपयोगी कामे असतात. गेल्या वर्षभरात लोकप्रतिनिधींनी केलेले विकासकामे दाखवा. मी
वर्षभरात नऊ बंधा-यासाठी निधी आणला.
सातत्याने केलेली विकासकामे दाखवतो, असे आव्हानही लंके यांना दिले.
प्रत्येक निवडणुकीत जनतेला पर्याय हवा असतो. यावेळी तो चुकला की बरोबर हे जनताच ठरविल. कोविड सेंटरसाठी शासन सर्व पुरवत असताना स्वतःच्या नावाचा गौरव कशासाठी. ज्याच्यावर नागरीकांचा उदरनिर्वाह असतो असे शाश्वत काम उभे रहावे. गळ्यात हात टाकणे, वाढदिवस साजरे करणे हे फार काळ टिकत नसतं. मीपणा इतका आहे की मत नाही दिले म्हणून दम दिला जातो. जनतेला वेड्यात काढून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे, असा पाणउताराही झावरे यांनी केला.
या वेळी बाजार समितीचे संचालक खंडू भाईक, मोहन रोकडे, सरपंच माधवराव पवार, सीताराम पवार, भास्करराव ढोले, गणपतराव पवार, हनुमंत पवार उपस्थित होते.
कंगणा, रिया आणि राऊतांचे राहु द्या
शेतक-यांच्या दृष्टीने कंगणा, रिया आणि राऊत यांचे शेतक-यांना काही देणे-घेणे नाही. मुसळधार पावसाने उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. कोरोनाने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विळखा घातला आहे. सरकार व लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, ्असा सल्लाही झावरे यांनी दिला.संपादन - अशोक निंबाळकर