

Weather Warning Issued: Ahilyanagar to Face Intense Cold Spell Soon
Sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. जिल्ह्याचे किमान तापमान ८.३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्याचे भारतीय हवामान खात्याच्या हवामान केंद्रावरील नोंदीनुसार दिसून येते. आगामी काळात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.