आनंदाची बातमी! 'अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांगांचे १२८ गुरुजी कायम'; न्यायालयाचे निर्देश; दीड तपाच्या लढ्याला यश
Justice for Disabled Teachers: न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने राज्यातील विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित शिक्षकांना पदस्थापना दिली.
अहिल्यानगर: दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या गुरूजींनाही नोकरीसाठी अनेक दिव्यांतून जावे लागले. गेल्या दीड तपाच्या लढ्यानंतर ते नोकरीत कायम झाले. जिल्ह्यातील १२८ विशेष तज्ज्ञ व विशेष शिक्षकांना जिल्हा परिषदेने आज सामावून घेतले.