Ahilyanagar : दोन मैत्रिणींच्या मदतीनं तरुणाला लुटलं, तिघांना अटक

Ahilyanagar : मैत्रिणींच्या मदतीनं तरुणाला अडवून त्याला लुटल्याचा प्रकार अहिल्यानगरमध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या मैत्रिणीना ताब्यात घेतलंय तर तीन आरोपींना अटक करण्यात आलीय.
Three Arrested In Ahilyanagar Robbery Case

Three Arrested In Ahilyanagar Robbery Case

Esakal

Updated on

दोन मैत्रिणींच्या मदतीने लुटमार करणाऱ्या तिघा सराईत आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी गर्भगिरी फाटा येथे एकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते. आरोपींकडून दोन लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शुभम शहादेव बडे (वय २६, रा. वाणीनगर, पाइपलाइन रोड, सावेडी), सोहेल पापाभाई सय्यद (वय २९, रा. देवटाकळी, ता. शेवगाव) व अशपाक नासिर पठाण (वय २८, रा. यशवंतनगर, भिंगार) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com