
श्रीरामपूर : नगर जिल्हा हा राज्यात गुन्हेगारीच्या बाबतीत सर्वोच्च स्थानावर, तर मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या तुलनेत जिल्ह्यातील पोलिस मनुष्यबळ अत्यंत अपुरे असून, एका कर्मचाऱ्याकडे २० ते २५ गुन्ह्यांचा तपास येतो. त्यामुळे तपासाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी श्रीरामपूर येथे केले.