अहिल्यानगरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला, धावत्या गाडीवर गोळीबार

Ahilyanagar News अहिल्यानगरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.
Firing on Shiv Sena Shinde Leader's Vehicle in Ahilyanagar

Firing on Shiv Sena Shinde Leader's Vehicle in Ahilyanagar

Esakal

Updated on

अहिल्यानंगरमध्ये श्रीरामपूर इथं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबाराची घटना घडलीय. अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळीबार केला. सुदैवाने हल्लेखोराचा नेम चुकल्यानं शिंदे गटाच्या नेत्याचा जीव थोडक्यात वाचला. प्रशांत कहाणे असं पदाधिकाऱ्याचं नाव आहे. या हल्ल्याची नोंद पोलिसात झाली असून घटनेमुळे श्रीरामपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com