
Ahilyanagar hit by retreating monsoon fury – one dead, two missing, heavy rainfall floods several areas.
Sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यातील दक्षिण भागातील तालुक्यांत रविवारी रात्री व सोमवारी अतिवृष्टी झाली. विशेषतः पाथर्डीत हाहाकार उडाला. पाथर्डीत तालुक्यातील दोन जण पुरात बेपत्ता झाले. २६ जनावरे पुरात वाहून गेली. घरांची पडझड झाली. रेस्क्यू टीमने पुरात अडकलेल्या १२७ जणांना वाचविले. चोवीस तासांत कोट्यवधींचे नुकसान झाले.