

JCB deployed by Ahilyanagar Municipal Corporation to demolish illegal slaughterhouses following local protests.
Sakal
अहिल्यानगर : शहरातील अवैध कत्तलखान्यांचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शहरातील काही भागांत मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलखाने असल्याची माहिती समोर आली. प्रशासनाची परवानगी न घेता अनेक अवैध कत्तलखाने असल्याचे महापालिता आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेल्या पाहणीत समोर आले. त्यामुळे महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. अवैधपणे सुरू असलेल्या या कत्तलखान्यांवर मोठ्या पोलिस बंदोबस्तात जेसीबीद्वारे कारवाई करण्यात आली.