
Chairperson posts of Ahilyanagar Panchayat Samitis in Shrirampur, Shevgaon, and Rahuri declared open for general category candidates.
Sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतिपदासाठी आज (मंगळवारी) आरक्षण काढण्यात आले. श्रीरामपूर, शेवगाव आणि राहुरी पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले. तेथे प्रस्थापितांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगणार आहे. जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नगर तालुका पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले.