
Ahilyanagar Police keep 6,500 criminals under watch through the advanced ‘Two Plus’ surveillance system.”
Sakal
-अरुण नवथर
अहिल्यानगर: जिल्ह्याचा क्राईम रेट जसा वाढत चालला आहे, तशी येथील गुन्हेगारांची संख्या देखील वाढली आहे. जिल्ह्यात आजरोजी तब्बल सहा हजार ५५२ गुन्हेगार असून, त्यांनी दोनपेक्षा अधिक गुन्हे केलेले आहेत. त्यात ३६४ हिस्ट्रीशीटर आरोपींचा देखील समावेश आहे. पोलिस प्रशासनाने ‘टू प्लस’ प्रणालीद्वारे या सर्व गुन्हेगारांची माहिती संगणकीकृत केली असून, त्या माध्यमातून जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासन या गुन्हेगारांवर वॉच ठेवून आहे.