

Subsidy for Wells Boosts Tribal Farmers Under Krushi Swavalamban Yojana in Ahilyanagar
Sakal
-अशोक निंबाळकर
अहिल्यानगर: अनुसूचित जाती-नवबौद्ध व आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणली आहे. नवीन विहीर खोदाईसाठी तसेच जुनी विहीर दुरुस्ती आर्थिक मदत केली जाते. त्या योजनांमुळे दरवर्षी शेकडो नवबौद्ध व आदिवासी शेतकरी स्वावलंबी बनत आहेत.