
Ahilyanagar Tension After Religious Insult Police Lathicharge Protesters
Esakal
अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरुंचे नाव लिहून विटंबना करण्यात आली होती. याचा निषेध म्हणून कोटला इथं अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर मुस्लिम बांधवांचं आंदोलन सुरू होतं. रास्ता रोको केल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर मोर्चाही काढला जाणार होता. मात्र रस्ता रिकामा करण्याचे निर्देश आल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. लाठीचार्जमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. दरम्यान, धर्मगुरुंचे नाव रस्त्यावर लिहिल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीय.