Ahilyanagar News : पट घटला; गुरुजींना घाम फुटला; तीन वर्षांत १५७ शिक्षक अतिरिक्त,९ शाळांना कुलूप
विद्यार्थीच नसल्याने जिल्ह्यातील ९ शाळांना कुलूप लावावे लागले. परिणामी १५७ शिक्षक अतिरिक्त ठरले. जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५४५ शाळा आहेत. पहिली ते आठवीचे वर्ग आहेत. यंदा १ लाख ९८ हजार ७१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
अहिल्यानगर : जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. विद्यार्थ्यांअभावी वर्ग बंद पडत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. झेडपी शाळांत गेल्या तीन वर्षांत तब्बल ३० हजारांनी विद्यार्थी संख्या रोडावल्याने त्यांना घाम फुटला आहे.