
अहिल्यानगर: जिल्हा परिषदेतील तब्बल पावणेपाच हजार गुरुजींच्या बदल्या झाल्या आहेत. काही संवर्गाची बदली प्रक्रिया सुरू आहे. गुरुजी बदलीच्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. ते आदेश मिळाले आहेत. मात्र, कार्यमुक्तीसंदर्भात अनिश्चितता आहे. जिल्ह्यात पावणेपाच हजार शिक्षकांच्या हाती बदल्यांचे आदेश आले आहेत.