
Ahilyanagar–Sambhajinagar road riddled with potholes; asphalt work delayed, tender process questioned.
Sakal
-विनायक दरंदले
सोनई : अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास विजयादशमीपर्यंत डांबराची उपलब्धता होत नसल्याचे कारण सांगून संबंधित विभाग तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या विचारात आहेत. महामार्गाची अवस्था गंभीर झाली असताना अधिकारी मात्र गंभीर नसल्याचा अजब प्रकार यानिमित्ताने पुढे आला आहे. पितृपक्ष आणि डांबराची अडचण म्हणून चक्क खड्ड्यांवर खडी टाकण्यासाठी ठेकेदाराचा शोध सुरू असल्याचे वास्तव संबंधितांच्या चर्चेतून समोर आले आहे.