अहमदनगर : शिक्षकाला SBI च्या नावाने लाखोंचा गंडा | Online Fraud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

अहमदनगर : शिक्षकाला SBI च्या नावाने लाखोंचा गंडा

अहमदनगर : राजापूर (ता. संगमनेर) येथील शिक्षकाची ऑनलाईन (Online) दोन लाख सहा हजार रूपयांची फसवणूक झाल्याची घटनासमोर आली आहे. फसवणूक झालेल्या शिक्षकाने येथील सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर त्रिंबक सोनवणे (वय 43) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर एका व्यक्तीने फोन केला. एस.बी.आय. कस्टमर केअरमधून (SBI Customer care) बोलतो, असे सांगितले. एस.बी.आय.मधून बोलत असल्याने फिर्यादी यांनी त्याच्याशी बोलणे सुरू ठेवले. त्याने फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलमध्ये एनीडेस्क (Any Desk) नावाचे ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. यानंतर त्या व्यक्तीने फिर्यादीला योनो (YONO) व योनोलाईट (YONO LITE) हे दोन ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगून त्यामध्ये एटीएम कार्डची (ATM card) माहिती भरण्यास सांगितली. त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे फिर्यादी करत होते. यानंतर काही वेळाने फिर्यादीच्या बॅंक खात्यातून दोन लाख सहा हजार 81 रूपये कट झाले. फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी अहमदनगर सायबर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले पुढील तपास करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagaronline fraud
loading image
go to top