Ahmednagar : तरुण पिढीवर व्यसनाचा आघात; गुटखा बंदीसाठी प्रशासन ठोस भूमिका केव्हा घेणार? खोल जखमा वेदनादायी!

किशोरवयात असताना व्यसन लागते आणि कुटुंबाची जबाबदारी आल्यानंतर कर्करोगाने मृत्यू होतो.
gutka
gutka sakal

श्रीकांत राऊत

अहमदनगर - नावालाच गुटखाबंदी असल्याने शहरासह जिल्ह्यात बिनबोभाटपणे गुटखा व सुगंधी तंबाखूची सर्रास विक्री सुरू आहे. पोलिस, अन्न व औषध प्रशासन उघड्या डोळ्याने सर्व काही पाहात आहे. गुटखा व तंबाखू सेवनाने झालेल्या कर्करोगासारख्या भयंकर रोगामुळे अनेक कुटुंब उद्‍ध्वस्त होत आहेत. विद्यार्थी नशेच्या आहारी जात आहेत. अनेकांचे जीव गेले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जखमा वेदनादायी आहेत. गुटखा बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन ठोस भूमिका केव्हा घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मित्रांसोबत सुरुवातीला तंबाखूचे व्यसन लागले. त्यानंतर सुंगधी गुटख्यात तो बुडून गेला. पाच-दहा मिनिटांला गुटख्याची पाकिटे तोंडात कोंबू लागला. साथीला सिगारेटही आली. मात्र वर्ष-दीड वर्षातच घशामध्ये परिणाम जाणवू लागला. तपासणीत कॅन्सरचे निदान झाले. लाखो रुपये खर्चून उपचार सुरू झाले. परंतु शरीर उपचारांना साथ देईना. अखेर एक दिवस व्हायचे तेच झाले. तो हे जग सोडून गेला. महाविद्यालयीन शिक्षण नुकतेच संपून कंपनीत नोकरीला लागलेला मुलगा असा अचानक गेल्याने कुटुंब उद्‍ध्वस्त झालं.

त्याचा आई-वडिलांना धक्का बसला. ही घटना आहे, सावेडी उपनगरात राहणाऱ्या एका कुटुंबाची. व्यसन करणारा तर निघून गेला; मात्र त्याच्या वेदना त्याचे कुटुंब आजही भोगतेय, अशी अनेक उदाहरणे आहेत. बंदी असताना मावा, गुटखा, सुंगधी तंबाखूची कोट्यवधींची उलाढाल होत आहे. ४० टक्के कर्करोगाचे प्रकार तंबाखूशी निगडीत आहेत. शरीरातील ४० अवयवांना कर्करोग होण्याचा धोका असल्याचे डॉक्टर सांगतात.

gutka
Ahmednagar : दप्तर दिरंगाईने शिक्षण विभागात दीड कोटी पडून; तीन महिन्यांपासून शाळा चालकांचे ‘झेडपी’त हेलपाटे

कर्करोग हा अचानकपणे होणारा रोग नाही. किशोरवयात असताना व्यसन लागते आणि कुटुंबाची जबाबदारी आल्यानंतर कर्करोगाने मृत्यू होतो. हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्यानंतर पालिकेने शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील टपऱ्या हटविण्यास सुरुवात केली. ही कारवाई नेहमीप्रमाणे वेळ मारुन नेणारी नको. या टपऱ्या शाळांच्याजवळ पुन्हा लावल्या जाणार नाहीत, यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

गोजिरवाणा संसार उघड्यावर

वृद्ध आई-वडील, दोन गोंडस मुली आणि पत्नी असा त्याचा गोजिरवाणा संसार होता. राहुरी तालुक्यातील एका कारखान्याबाहेर तो टपरी चालवायचा. त्याठिकाणी स्वत:च मावा तयार करायचा आणि विकायचा. ग्राहकाला देण्याआधी हातावर मळलेला माव्याची चुटकी तोंडात टाकायची. कालांतराने माव्याचे व्यसन जास्त प्रमाणात झाले. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असलेल्या चाळीशीतील या तरुणाला तोंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. नगरमधील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, कॅन्सरचे निदान स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. पैशांची जुळवाजूळव करुन कुटुंबाने उपचाराचा खर्च केला. मात्र, मावा व तंबाखूच्या व्यसनामुळे गोजिरवाणा संसार उघड्यावर आला.

gutka
Gutka Eating Habit : गुटख्याचं व्यसन सोडवणं अशक्यच?, एकदा ही प्रभावी पद्धत वापरून तर पहा

ग्लोबोकन’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार..

भारतात २५ कोटी नागरिक तंबाखूचे सेवन करतात

महाराष्ट्रात २.५ कोटी नागरिक तंबाखूचे सेवन करतात

देशात दररोज २२०० मृत्यू कर्करोगामुळे होतात.

४० टक्के कर्करोग

तंबाखूशी निगडित

जनजागृतीची

गरज : डॉ. सोनवणे

गुटखा, तंबाखू, मावा आदींच्या सेवन करणे आरोग्यासाठी घातक व धोकादायक आहे. ४० टक्के कर्करोगाचे प्रकार तंबाखूशी निगडीत आहेत. गुटख्यात मॅग्नेशिअम कार्बोनेटसारखे घातक घटक असतात. त्याचा दुष्परिणाम गालाच्या आतील आवरणावर होतो. गुटखा खाणाऱ्यांचे तोंड आकुंचन पावते. जीभ, गाल, घसा, मूत्रपिंड अशा अवयवांना तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होण्याचा धोका असल्याचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे सांगतात.

gutka
Solapur : सोनके- तिसंगी 400 कुसेकने पाणी सोडले हा निव्वळ लोकांची थट्टा; सांगोला तालुक्यात ओढ्यानाल्याना पाणी...

ब्रँडेड गुटख्यांची बेफाम विक्री

अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या गुटख्याची विक्री व होलसेल व्यापार शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. पोलिस प्रशासन कधीतरी कारवाई करते. अन्न व औषध प्रशासन कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचे कारण समोर करते. नगर शहरात कोतवाली व तोफखाना दोन पोलिस ठाणी आहेत. त्यांच्या हद्दीत राजरोस गुटखा खुलेआम विकला जातोय. मात्र, कारवाई नाही. गुटखा विक्रीची कल्पना नाही की पोलिसांच्या आशीर्वादानेच हा खेळ सुरू आहे, याचा खुलासा पोलिस प्रमुखांनी करावा, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com