Ahmednagar : दिवाळीपूर्वीच अग्रीम; शेतकऱ्यांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा-धनंजय मुंडे

कांद्याला आम्ही २ हजार ७१० रुपये बाजार भाव दिला; त्यावेळेस माध्यमांनी त्याची बातमी केली
ahmednagar
ahmednagarsakal

अहमदनगर - विमा कंपन्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत. ज्या महसूल मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तेथे आणि सलग २१ दिवस पावसाचा खंड पडलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम देण्याचा निर्णय झाला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ती रक्कम मिळेल, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मुंडे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

कांद्याला आम्ही २ हजार ७१० रुपये बाजार भाव दिला. त्यावेळेस माध्यमांनी त्याची बातमी केली नाही. मात्र, काहीतरी उघडल्यास तो मुद्दा उचलून धरायचा, हे चुकीचे आहे. अजितदादांनी पीयुष गोयल यांच्यासोबत बैठक घेऊन खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी २ हजार २०० रुपये भाव देण्याचा निर्णय घेतला, हासुद्धा ऐतिहासिक निर्णय आहे. त्याकडे माध्यमांनी दुर्लक्ष केल्याची खंत मुंडे यांनी व्यक्त केली.

धनंजय आणि संग्राम एकच

धनंजयचा संग्राम आणि संग्रामात धनंजय हे दोन्ही एकच आहेत. हा शब्दाचा गंध आहे. तुम्हाला काय समजायचे ते समजून जा, असे म्हणत त्यांनी साहित्यिक टिप्पणी केली. भैयांनी खूप माणसं वाचली. परंतु आता त्यांनी पुस्तक वाचली पाहिजेत, असा सल्लाही मुंडे यांनी दिला.

ahmednagar
Ahmednagar News : अण्णा हजारे यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांना नोटीस

संख्याबळानुसार निर्णय होईल

राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्याचा विषय निवडणूक आयोगाकडे आहे. ज्यांच्या गटाकडे लोकशाहीनुसार जास्त संख्याबळ आहे, त्यानुसारच आयोग निर्णय घेईल. अजितदादांच्या गटाकडे सर्वाधिक आमदार व पदाधिकारी आहेत, असा दावा मुंडे यांनी व्यक्त केला. खासदार संजय राऊत यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राऊतांना किती महत्त्व द्यायचे हे तुम्हीच ठरवले पाहिजे.

ahmednagar
Ahmednagar News : सराफ बाजारावर आता सीसीटीव्हीची नजर

भैयांकडे थांबत नाही

आमदार संग्राम जगताप हे मला ज्येष्ठ बंधू मानतात. मीही त्यांना कनिष्ठ बंधू मानतो. मात्र, आठवड्यातून दोनदा बीडहून नगरमार्गे मुंबईला जातो. परंतु त्यांना कधीही जेवणासाठी त्रास दिला नाही. त्यांनाच कधी कधी प्रश्न पडत असेल आमदार असूनही मला हे जेवणाचाही त्रास देत नाहीत. आमचे बंधूप्रेम कायम आहे. आज त्यांचे साहित्य संमेलनाचे निमंत्रण मला नाकारता आले नाही, असा नर्मविनोदी वक्तव्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com