esakal | अहमदनगर : पोलिस असल्याचा बनाव करणारा जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

crime

अहमदनगर : पोलिस असल्याचा बनाव करणारा जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : पोलिस असल्याचा बनाव करून वाहन चालकांना लुटणाऱ्या टोळीतील फरार आरोपी शोएब गुलाब कुरेशी (वय २२, रा. वार्ड नंबर दोन, श्रीरामपूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने श्रीरामपूरमध्ये अटक केली.

श्रीधर जंगलू सोनवणे (वय ३४, रा. एकलहरे, ता. श्रीरामपूर) हे ता. २७ मे २०२१ रोजी टेम्पो (एमएच ४२ एम ९४८२) मध्ये लोखंड, पितळ, अल्युमिनियम हे भंगारातील साहित्य घेऊन नगर-मनमाड महामार्गाने येत होते. राहुरी तालुक्‍यात शनिशिंगणापूर फाट्याजवळ सकाळी सहा वाजता इर्टिगा कारमधील व्यक्‍तींनी त्यांना थांबविले. "आपण पोलिस असल्याचे सांगून हे भंगार कोठे चालविले, याची बिल्टी दाखव, असा दम दिला,' त्यांना इर्टिगा कारमध्ये बसवून वरवंडी शिवारात निर्जनस्थळी सोडून दिले. त्यांच्याकडील टेम्पो आणि भंगार असे चार लाख ९१ हजार ३२८ रुपयांचा ऐवज लुटला होता.

हेही वाचा: 'मंदिरं बंद आहेत, मग देव कुठे आहे?, तर देव...'

सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपी तोफिक सत्तार शेख (वय ३५, काजीबाब रोड, श्रीरामपूर), साजीद खालीद मलिक (वय २४, पापा जलाल रोड, श्रीरामपूर), जावेद मुक्‍तार कुरेशी (वय २४, रा. बजरंग चौक, श्रीरामपूर), शाम भाऊराव साळुंके (वय २०, रा. खटकळी, बेलापूर), अरबाज जाकिर मन्सुरी (वय १९, रा. कुरेशी मोहल्ला, श्रीरामपूर) यांना अटक केली होती. शोएब कुरेशी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. तो श्रीरामपूरला आल्याची माहिती मिळताच, त्याला सापळा लावून अटक करण्यात आली. त्याला पुढील कार्यवाहीसाठी राहुरी पोलिसांकडे सोपविण्यात आले.

loading image
go to top