Ahmednagar News : नगर शहराला मिळणार ४० इलेक्ट्रिक बस - आमदार संग्राम जगताप

नवीन वर्षाची मोठी भेट; आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
ahmednagar city will get 40 electric bus public transport sangram jagtap
ahmednagar city will get 40 electric bus public transport sangram jagtapsakal

अहमदनगर : सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा असलेल्या शहर बसचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे. केंद्र सरकारकडून शहरासाठी पहिल्या टप्प्यात ४० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत.

महानगरपालिकेच्या मालकीच्या या बस असतील. त्यामुळे कमी दरात शहरात अंतर्गत प्रवास करणे सुकर होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी दिल्लीत पाठपुरावा केला होता. येत्या महिनाभरात बस सुरू होणार आहेत.

केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट खात्यामधून यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. नगर शहरात बसचा मुद्दा अनेकदा उपस्थित होतो. ठेकेदाराला बसचा ठेका देण्यात येत होता. त्यांच्याकडून ठरावीक मार्गावरच या बस धावत होत्या. मोठ्या रस्त्यावर रिक्षांची संख्या जास्त आहे. रिक्षात नियमापेक्षा जास्त प्रवासी बसल्यामुळे अपघाताची भीती असते.

पोलिसांकडून जुजबी कारवाई करण्यात येते. रिक्षाचालकांचे व प्रवाशांचे अनेकदा वादही झालेले आहेत. हे सर्व प्रश्न शहरात बससेवा व्यवस्थित नसल्याने होत आहेत. याबाबत आमदार जगताप यांनी गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीत पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. आता लवकरच ही सेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यात ४० बस असतील. पुढील टप्प्यात त्यात आणखी वाढ होणार आहे.

बस थांबण्यासाठी केडगाव येथे बस डेपो उभारण्यात येणार आहे, तसेच तेथेच चार्जिंग स्टेशन करण्यात येईल. मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर या बस असतील. केडगाव येथे साडेपाच एकरांपैकी अडीच एकरांवर बस डेपो उभारण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्ग, उपनगरांत या बस धावतील. उपनगरांतील नागरिकांची मोठी गैरसोय होते.

रिक्षाला जास्त रक्कम द्यावी लागते. ही गैरसोय आता दूर होईल. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी वेगळ्या बसचे नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

मुंबईतील ‘बेस्ट’च्या धर्तीवर नवीन बस

केडगाव येथे साडेपाच एकरांवर डेपो

सर्व बस इलेक्ट्रिक असतील

३० ते २५ सीटच्या बस असतील

शहरातील अंतर्गत वाहतूक हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नगरकरांना चांगली बससेवा मिळावी, यासाठी मी काही महिन्यांपासून दिल्लीत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत होतो. त्याला आता यश आले आहे. शहराला मिळणाऱ्या बस इलेक्ट्रिक असल्याने प्रदूषणही होणार नाही. डेपोसाठी जागा उपलब्ध झाली आहे. लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.

- संग्राम जगताप, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com