

Election Commission postpones four Nagar Palika polls in Ahilyanagar for the second time; confusion spreads among citizens.
sakal
अहिल्यानगर : जिल्ह्यातील ११ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा शनिवारी (ता.२९) रात्री उशिरा आदेश काढला. या आदेशान्वये जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी या तीन नगरपालिका आणि नेवासे नगरपंचायतीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. राहाता नगरपालिका वगळता उर्वरित ७ नगरपालिकांच्या ठराविक प्रभागापुरतीच निवडणूक पुढे ढकलली आहे.