Sun, Jan 29, 2023

Ahmednagar News: कुणाचेही नाव न घेता पातळी सोडून टीका केली नाही ; खा. विखे
Published on : 23 December 2022, 7:37 am
पाथर्डी : ‘काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात आपण व्यक्तिगत कोणाचेही नाव घेतले नव्हते, अथवा पातळी सोडून टीका केलेली नव्हती. मात्र, जे शब्द आपण उच्चारले नाहीत, त्यास मंगळवारच्या (ता. २०) ‘सकाळ’मध्ये ठळकपणे प्रसिद्धी देण्यात आली. त्यामुळे आपणास वेदना झाल्या,’ असा खुलासा डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
त्यात म्हटले आहे, की राजकीय क्षेत्रात पाळाव्या लागणाऱ्या मर्यादेची मला जाणीव आहे. पातळी सोडून भाष्य करण्याची सवय आणि संस्कार आपल्यावर नाहीत. आपण जो शब्द उच्चारला नाही, त्या शब्दास प्रसिद्धी देण्यात आल्याचा मला खेद वाटला.(Ahmednagar News)