Ahmednagar : पाऊस लांबल्याने हातावर पोट भरणार्‍याचे हाल! मजुरांना लिंबोळ्याचा आधार

Ahmednagar
Ahmednagar

बोधेगाव - जुन महिनां संपत आला असून अजुनही पाऊस पडत नसल्याने हातावर पोट असणाऱ्या बोधेगाव (ता.शेवगाव) येथिल मजुरांनी हाताला काम आणि पोटाला भाकर मिळावी यासाठी लिंबोळ्याचा आधार शोधला आहे.

Ahmednagar
Karnataka : दारुण पराभव होताच भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून गोंधळ; मोदींना पत्र लिहित सोमण्णांचा पदावर दावा

पावसाळ्यात शेतशिवार फुलल्यानंतर गवत काढण्याबरोबर कोळपणी मोघडणी फवारणी आदी शेतातील उदयोगामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत असे. परंतु चालुवर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाल्याने हताला काम मिळत नसल्याने मजुरांची वणवण पहायला मिळत होती. मात्र हातावर पोट असणाऱ्या मजुरांनी हार नं मानता पोटाची खळगी भरण्यासाठी आपला स्वाभिमान गहाण न ठेवता लिंबोळ्याचा आधार शोधला आहे.

Ahmednagar
Mumbai Rain : तोच 'परिवार' मुंबईकरांचा खरा गुन्हेगार! शहरातील गटरी तुंबताच भाजपचा हल्लाबोल

लिंबोळ्या वेचण्यासाठी १० मजुर एकत्र येतात

वीस किमी पासुन शंभर किमीपर्यंतच्या प्रवासात एक महिला ऐंशी पासुन शंभर किलोपर्यंत लिंबोळी गोळा करते.पाच रुपये किलोप्रमाणे एका व्यक्तिस चारशे ते पाचशे रुपयेप्रमाणे मिळतात. परंतु टेम्पो भाड्यापोटी प्रति व्यक्तिस तिनशे रुपये द्यावे लागत असल्याने त्यांना फक्त दोनशे रुपयावरच समाधान मानावे लागते.

२० रुपयाच्या दराप्रमाणे पत्र्याच्या डब्यातून (७ ते ८ किलो) पहिल्या लिंबोळ्या घेतल्या जायच्या परंतु महागाई वाढत गेल्याने गेल्या दोन वर्षापासुन आता डब्याऐवजी ५ रुपये किलोप्रमाणे त्या घेतल्या जातात.

- माऊली शिंदे-लिंबोळी व्यापारी, बोधेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com