Vikhe Patil : कुणी कर्ज देत नव्हते, त्यावेळी स्वतः विखे पाटील जामिनदार राहिले, टीका व्यक्तिद्वेषातून

वाढीव सभासदांमुळे विरोधकांचा विजय
Radhakrishna Vikhe Patil election ganesh factory politics ahmednagar
Radhakrishna Vikhe Patil election ganesh factory politics ahmednagaresakal

शिर्डी : गणेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर सभासद संख्या वाढविली असती तर या निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. ज्यांच्या काळात कारखाना तोट्यात जाऊन दोन वर्षे बंद पडला होता, तिच मंडळी आता निवडणुकीचा निकाला लागताच आजवर हा कारखाना चालविणा-या विखे पाटलांवर व्यक्तीद्वेषातून टीका करण्यात धन्यता मानत आहेत, अशी टीका माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

''गणेश’च्या निवडणूक निकालानंतर विखे पाटील गटाची भूमिका मांडताना कोते म्हणाले, की मुळात हा कारखाना यापूर्वी पंचवीस वर्षे कोल्हे गटाच्या ताब्यात होता. या गटाची सभासद संख्या अधिक असल्याने तो निवडणुकीत त्यांच्याच ताब्यात राहिला. त्यामुळे कुणाचा पराभव व कुणाचा विजय असे अर्थ लावून विखे पाटलांवर टीका करण्यात काही अर्थ नाही. विखे गटाने कारखाना ताब्यात असताना सभासद संख्या वाढविली असती तर निवडणुकीचा निकाल अर्थातच त्यांच्या बाजुने लागला असता.

Radhakrishna Vikhe Patil election ganesh factory politics ahmednagar
Crime news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणाला कारावास, दंड

विशेष म्हणजे आजवर कोल्हे गट सभासद संख्या वाढवूनच आजवर या कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवित आला, हे उघड सत्य आहे. ही वस्तुस्थिती माहित असूनही निकालानंतर केली जाणारी भाषणे कुणालाही पटणारी नाहीत.विरोधकांच्या तोट्याच्या पॅटर्नमुळे गणेश बंद पडला. आता तो चालविण्यासाठी नेमके काय केले जाणार आहे, हे सांगायला कोणीही तयार नाही. विजयी सभेत देखील त्याचा उल्लेख कुणी केला नाही.

Radhakrishna Vikhe Patil election ganesh factory politics ahmednagar
Mumbai : मनपा कर्मचारी-अधिकाऱ्यांवरील ईडी चौकशी थांबवा! म्युनिसिपल मजदूर संघाची मागणी

गेल्या आठ वर्षात विखे पाटील यांनी प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून हा कारखाना चालविताना आजवर एकूण वीस लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. गणेशची दैनंदिन गाळप क्षमता अठराशे मेट्रिक टनावरून तीन हजार मेट्रिक टनापर्यंत वाढविली. ज्यावेळी गणेश सुरू करण्यासाठी कुणी कर्ज देत नव्हते. त्यावेळी या कर्जाला स्वतः विखे पाटील जामिनदार झाले. मात्र त्याचा त्यांनी कधी गाजावाजा केला नाही.

म्हणूनच विरोधकांना असूया

राज्यातील वजनदार मंत्री म्हणून विखे पाटलांचा वाढता प्रभाव आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला मिळालेली चालना याची विरोधकांना असुया आहे. बाहेरची काही पाहुणे मंडळी फक्त दिशाभूल करून गेली. त्यांनी एकदाही गणेश आम्ही चालवू असे विधान केलेले नाही याकडे कोते यांनी लक्ष वेधले.

ज्यांनी गणेश परिसरातला उस सातत्याने पळविला. त्यांची सभासद संख्या अधिक असल्याने या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. राजकारणात विखे विरूद्ध जिल्ह्यातील अन्य सर्व विरोधक असे चित्र वर्षानुवर्षे पाहायला मिळते. जनाधाराच्या जोरावर विखे पाटील आज सर्वांना पुरून उरलेत. सभेचा फड गाजवणे वेगळे आणि अडचणीतला गणेश पुढे चालविणे वेगळे हे विरोधकांनी लक्षात घ्यावे.

- कैलास कोते, माजी नगराध्यक्ष, शिर्डी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com