Ahmednagar : मोबाईलचोरीचे फॉरेन कनेक्शन; मोबाईल चोऱ्या वाढल्या; परराज्यातील आरोपींचा समावेश

तर कुणाचा लाख रूपयांचा मोबाइल हे चोरटे अलगदपणे लंपास करत आहेत.
ahmednagar
ahmednagar sakal

अरुण नवथर

अहमदनगर - मोबाईल चोरीच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरी केलेल्या मोबाईलची परराज्यासह थेट नेपाळमध्ये विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासातून समोर आला आहे.

शहरासह जिल्हाभरात मोबाईल चोरीच्या दररोज २५ ते ३० तक्रारी दाखल होत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांपुर्वी मोबाईल चोरी करणारी टोळी गजाआड केली होती.

चोरीच्या मोबाईलची परराज्यात तसेच नेपाळसारख्या देशात मिळेल, त्या किंमतीत विक्री केल्याची कबुली आरोपींनी दिली होती. या कारवाईनंतर मोबाईल चोरीच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत. अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून मोबाईल चोरीचे हे रॅकेट सुरू आहे. कुणाचा पाच हजारांचा,

तर कुणाचा लाख रूपयांचा मोबाइल हे चोरटे अलगदपणे लंपास करत आहेत.

चोरी केल्यानंतर मोबाईलची स्थानिक ठिकाणी विक्री न करता वेगेवेगळ्या राज्यात तसेच वेळेप्रसंगी नेपाळसारख्या देशात विक्री करण्याची साखळी निर्माण केली. त्यामुळे मोबाईल चोरीच्या दररोज २० ते २५ तक्रारी दाखल होत आहेत.

दृष्टिक्षेपात..

३५ -आरोपी अटक

०२ - टोळ्या जेरबंद

२५ - रोजच्या तक्रारी

पाचशे- हजारांत विक्री

ahmednagar
Nagpur Crime : ‘तू कोण आहे’ म्हणत भांडण सोडविणाऱ्याचा खून

मोबाईलला पासवर्ड ठेवलेला असेल, तरी फॉरमॅट मारल्यानंतर तो मोबाईल सुरू होतो. चोरटे पाचशे ते हजार अशा मिळेल, त्या किंमतीत मोबाईल विकतात. त्यामुळे मोबाईलधारकांनीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

कशी होते विक्री?

दोन ते तीन आरोपी मिळून गर्दीच्या ठिकाणी पाळत ठेवून अलगदपणे मोबाईलची चोरी करतात. चोरलेला मोबाईल फॉरमॅट करून स्थानिक दुकान अथवा ठराविक एजंटकडे मिळेल त्या किंमतीत विकतात. त्यानंतर संबंधित दुकानदार अथवा एजंट चोरीचे हेच मोबाईल परराज्यातील एजंटांना विकतात.

ahmednagar
Atiq Ahmed : अतिक अहमद यांना लोकसभेत वाहिली श्रद्धांजली; अध्यक्ष ओम बिरला म्हणाले...

गैरवापर नको म्हणून तक्रार

मोबाईल हरवला की चोरी गेलाय, हे चोरी करणारे सराईत गुन्हेगार समोरच्याला कळू देत नाहीत. संबंधित व्यक्ती मोबाईल चोरीची तक्रार देतो. मात्र, त्याची ही तक्रार मोबाईल परत हवा म्हणून नसते, तर त्या मोबाईलचा गैरवापर होऊ नये, यासाठीच असते. त्यामुळे पोलिसही या तक्रारीकडे गांभीर्याने पाहत नाहीत.

मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत. तक्रार येताच आम्ही कारवाई करतो. आतापर्यंत सुमारे पंधरा लाख रूपये किंमतीचे शंभर पेक्षा अधिक मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत दिले आहेत.

चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कोतवाली

ahmednagar
Satara Accident : एसटी-दुचाकीच्या धडकेत एक ठार, १५ प्रवासी जखमी

दररोज १० ते १२ गुन्ह्यांची नोंद

शहरात कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, नगर तालुका, एमआयडीसी या पोलिस ठाण्यांमध्ये मोबाइल चोरीच्या दररोज दहा ते बारा तक्रारी दाखल होतात. स्थानिक पोलिस मात्र किरकोळ चोरी समजून तक्रारीकडे दुर्लक्ष करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com