Atiq Ahmed : अतिक अहमद यांना लोकसभेत वाहिली श्रद्धांजली; अध्यक्ष ओम बिरला म्हणाले...

Atiq Ahmed
Atiq AhmedSakal

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले. परंपरेनुसार, पहिल्या दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी खासदारांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या यादीत दोन विद्यमान आणि 11 माजी खासदारांची नावे आहेत.

Atiq Ahmed
Gautam Gambhir : स्वतःला भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटते; भाजप खासदार गौतम गंभीर यांचे विधान

ओम बिर्ला यांनी उत्तर प्रदेशातील गुंड-राजकारणी अतिक अहमद यांनाही श्रद्धांजली वाहिली. अतिक अहमद यांची १५ एप्रिल रोजी प्रयागराज जिल्हा रुग्णालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. (Latest Marathi News)

श्रद्धांजली वाहताना सभापती ओम बिर्ला म्हणाले, "अतीक अहमद हे उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून 14व्या लोकसभेचे सदस्य होते. तसेच, अतिक अहमद हे रेल्वेवरील समितीचे सदस्य होते. त्याआधी ते उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य होते. अतिक अहमद यांचे 15 एप्रिल 2023 रोजी प्रयागराज येथे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. (Marathi Tajya Batmya)

Atiq Ahmed
Video: इर्शाळवाडीत अत्याधुनिक यंत्रणा पोहोचू शकत नाही, श्वान पथकातील 'फिरो'नं केली मोठी मदत

ओम बिर्ला यांनी विद्यमान खासदार रतनलाल कटारिया आणि बाळूभाऊ उर्फ ​​सुरेश नारायण धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, रणजित सिंग, सुजान सिंग बुंदेला, संदीपान थोरात, विश्वनाथ कानिठी, त्रिलोचन कानूनगो, इलियास आझमी, अनादी चरण दास, निहाल सिंग आणि राज करण सिंग यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

15 एप्रिल रोजी पोलीस उमेश पाल हत्येप्रकरणी प्रयागराज तुरुंगात बंद असलेले अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज जिल्हा रुग्णालयात घेऊन जात होते.

त्याचवेळी पत्रकारांच्या वेशात आलेल्या तिघांनी अतिक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या केली. मारेकऱ्यांकडे बनावट ओळखपत्र आणि कॅमेरे होते. अतिक अहमदचा खात्मा करून अंडरवर्ल्डमध्ये प्रसिद्ध व्हायचे होते, असे मारेकऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com