esakal | सोनईत अवैध दारूविक्री, दोन जणांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

सोनईत अवैध दारूविक्री, दोन जणांवर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनई : बेल्हेकरवाडी रस्त्यावरील पाण्याच्या उंच टाकीजवळ सोनई पोलिसांनी छापा घालून विनापरवाना देशी दारूच्या ९६ बाटल्या व एक दुचाकी जप्त करीत दोन जणांवर गुन्हा दाखल केला. या छाप्यात पोलिसांनी श्रीकांत सुदर्शन पालेपवार (वय ३२) व रणजित बाबूराव झाडगे (वय ४०, दोघे रा. सोनई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पाच हजार ७०० रुपयांची देशी दारू व दहा हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १७ एएफ ०६६०) जप्त केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व पथकाने ही कारवाई केली.

loading image
go to top