Karjat MIDC: कर्जत MIDCचा प्रस्ताव स्विकारला, 'या' ठिकाणी असणार नियोजित औद्योगिक वसाहत

तालुक्यातील नियोजित एमआय -डीसीसाठी कोंभळी, रवळगाव, थेरगाव या गावांच्या हद्दीतील जागा प्रस्तावित करण्यात आली आहे.
Ahmednagar
AhmednagarEsakal

Rohit Pawar Karjat Jamkhed MIDC: तालुक्यातील नियोजित एमआय -डीसीसाठी कोंभळी, रवळगाव, थेरगाव या गावांच्या हद्दीतील जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबतच्या अटी, शर्तीची पूर्तता करणारा प्रस्ताव उद्योग विभागाने स्वीकारला असल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली.

बुधवारी (ता.२७) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आमदार शिंदे आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या समवेत बैठक पार पडल्यानंतर शिंदे पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, धनंजय मोरे, शहाजी राजेभोसले, काकासाहेब तापकीर, सचिन पोटरे, पप्पू धोदाड, गणेश क्षीरसागर, गणेश पालवे आदी उपस्थित होते.

चारशे हेक्टरपेक्षा जास्त जागा यासाठी भूसंपादन करायची असल्याने राज्याचे जॉईट सीईओ भंडारी भेट देणार आहेत. ६ मार्चला उच्च अधिकार समितीची बैठक होईल. कर्जतच्या एमआयडीसी संदर्भात योग्य तो सकारात्मक निर्णय घेतला जाईल. एमआयडीसीची जागा सर्व गावकऱ्यांनी दाखवलेली आहे. त्यामुळे जागेसंदर्भात काहीही अडचण येणार नाही. लोकांनी तयार केलेल्या प्रस्तावाला सरकार मान्यता देईल. एमआयडीसी मंजूर झाल्यावर या ठिकाणी विविध उद्योगधंदे येण्यासाठी जास्तीचे प्रयत्न केले जातील, असेही शिंदे म्हणाले. (Latest Marathi News)

रोहित पवार यांनी केला हक्कभंग प्रस्ताव सादर

माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीला मंजुरी मिळण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मी नियमित पाठपुरावा करीत आहे. याबाबत सरकारच्या वतीने विधानसभेतही आश्वासने देण्यात आली. मात्र, राजकीय दबावापोटी ती पाळली जात नाहीत. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आणि एमआयडीसीचे सीईओ बिपीन शर्मा यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी हक्कभंग प्रस्ताव सादर केला.

Ahmednagar
Irfan Pathan : 'भारतीय क्रिकेट सुधारायचं असेल तर...' हार्दिक पांड्यावरून इरफानने BCCIला दिला मोठा सल्ला

कोल्ड की हॉट वॉर...

लोकसभेला कोण उमेदवार यापेक्षा निवडून येणाऱ्याला यावेळेस प्राधान्य असून, आपण लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार असल्याचे राम शिंदे यांनी यावेळी सांगितले. खासदार सुजय विखे आणि तुमच्यात कोल्ड वॉर सुरू आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना शिंदे म्हणाले, कोल्ड की हॉट वॉर आहे हे आताच सांगता येणार नाही. मात्र, उमेदवारीबाबत निर्णय पक्ष आणि नेतृत्वाने घ्यावा. (Latest Marathi News)

Ahmednagar
Medicine Rate: मोदी सरकारचा मोठा निर्णय; इन्फेक्शन, कोलेस्ट्रॉल, शुगरसह 100 औषधे स्वस्त होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com