esakal | मिरजगाव परिसरात बिबट्याचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

leopard

मिरजगाव परिसरात बिबट्याचे दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरजगाव : परिसरातील बेलगाव (ता.कर्जत) येथे लोक वस्ती लगत असलेल्या उसाच्या शेतामध्ये स्थानिक शेतकऱ्याला बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना स्थळी आढळून आलेले पायाचे ठसे तपासून वनविभागाने हे ठसे बिबट्याचेच असल्याचे सांगितले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे, येथील बाबर वस्तीवरील उसाच्या शेतात संदीप बाबर यांना सायंकाळी बुधवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बिबट्या दिसला. यावेळी

याच शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे देखील निदर्शनास आले. सरपंच आशिष शिंदे व उपसरपंच वैभव बाबर यांनी याबाबत वनविभागाशी संपर्क केला. वनविभागाचे अधिकारी येईपर्यंत गावात सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला होता.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

आज सकाळी वनविभागाचे पथक घटनास्थळी पाहणीला आले.वनरक्षक आजिनाथ भोसले व त्यांच्या पथकाने ठस्यांची बारकाईने पाहणी करून सदर ठसे बिबट्याचेच असल्याची पुष्टी केली. काही महिन्यांपूर्वी कर्जत तालुक्यात बिबट्याने घातलेले धुमाकूळ सर्वज्ञात असल्यामुळे सद्य स्थितीला परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घाबरून जाऊ नका

नागरिकांनी घाबरू नये. सतर्क राहून शेतीची कामे करणे आवश्यक आहे. एक दोन दिवसात पुन्हा बिबट्याचा वावर आढळला तर वन विभागामार्फत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल. विनाकारण चुकीच्या अफवा कोणी पसरवू नये. असे आवाहन वन विभागामार्फत तालुक्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.

loading image
go to top