

MLA Committee Reviews Ahmednagar Development Works as Only 8 of 27 Members Attend and Officials Face Possible Action
sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विधानमंडळ आमदार समिती आजपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यासाठी शहरात दाखल झाली. मात्र, या समितीतील २७ आमदारांपैकी केवळ ८ आमदारांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. मोठा गाजावाजा करत प्रशासनाने या समितीच्या दौऱ्याचे शाही नियोजन केले आहे. मात्र, त्या प्रमाणात सदस्यांनी हजेरी न लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.