Black Currant: आरोग्यासाठी गुणकारी डोंगरची काळी मैना खातेय भाव

Black Currant
Black Currantesakal

Black Currant: डोंगरची काळी मैना म्हणून ओळखली जाणारे करवंदे सध्या बाजारात चांगलाच भाव खात आहेत. ग्लासभर करवंदे १५ ते २० रुपयांना मिळतात, तर २०० ते ३०० रुपये किलोप्रमाणे त्याची विक्री होत आहे. वर्षातून एकदाच मिळणारे हे फळ आरोग्यासाठी फलदायी आहे.

करवंदे ही उन्हाळ्यातील फळे. कडक उन्हात करवंद खाण्याचे अनेक फायदे आहेत. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील नालेगाव, डीएसपी चौक, माळीवाडा, तारकपूर आदी भागांत करवंदे विक्रीस उपलब्ध झाली आहेत. विशेषतः माळशेज घाटातील करवंदे घेऊन येणारी शेतमजुरांची टोळी शहरात दाखल झाल्याचे दिसून येते.

Black Currant
Shirdi Nilwande Dam: तीन दिवसांच्या आत निळवंडे कालव्याची चाचणी बंद; 'हे' मोठं कारण आलं समोर

दिवसभर करवंदे तोडणारे आदिवासी मुले, महिला डोंगरात फिरतात. दुसऱ्या दिवशी कुटुंबप्रमुख ती विक्रीसाठी बाजारात नेतात. नगर जिल्ह्यातील गर्भगिरी डोंगररांगेतूनही करवंदे मोठ्या प्रमाणात येतात. अकोले तालुक्यातून येणारी करवंदे संगमनेर, तसेच उत्तरेतील जिल्ह्यांत विकली जातात.

पांढरीपूल, करंजी घाट आदी भागांतही मोठ्या प्रमाणात करवंदांच्या जाळ्या आहेत. जंगलात बिबटे, लांडग्यांच्या भीतीमुळे करवंदे तोडणारे लोक टोळक्यानेच डोंगरात जातात. पूर्वीप्रमाणे पद्धत वापरून ही करवंदे विकली जातात.

Black Currant
Nilwande Dam: 'मी निधी मागतो फडणवीस तिजोरी खोलून पैसे देतात', एकनाथ शिंदेंच मोठं वक्तव्य

पाणी पिण्याचा एक ग्लास करवंदे पंधरा ते वीस रुपये, अशा पद्धतीने विक्री केली जात आहे. नागरिक किलोचे माप न घेता ग्लास पद्धतीने माप घेतात व रस्त्याच्या बाजूला ग्रुपमध्ये खाताना दिसतात. करवंदांपासून कडक उन्हाळ्यात सरबतही केले जाते.

डोंगरची काळी मैना म्हटले, की थोडीशी गोड थोडीशी आंबट, अशी चव ओठांना स्पर्श करते. अनेक वेळा त्याचे महत्त्व अनेक जणांना माहिती नसते. बऱ्याच वेळा लहान मुलांना करवंदे खायला मिळालेली नसतात.

लहान मुलांच्या आरोग्यासाठीही ती उपयुक्त ठरतात. नागरिकांना वेगवेगळ्या आजारांमध्ये डॉक्टर करवंदे खाण्याचा सल्ला देतात, अशी माहिती करवंदे खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com