Ahmednagar News : दरोडेखोर रिक्षात, पोलिस कारमध्ये

पाठलागाचा थरार; कोतवाली पोलिसांची कारवाई
Ahmednagar News
Ahmednagar Newssakal

अहमदनगर : कोतवाली पोलिसांनी पळून जात असलेल्या दरोडेखोरांचा फिल्मी स्टाईलने पाच किलोमीटर पाठलाग करून त्यांना अटक केली. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. पकडलेल्या दरोडेखोरांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

रिक्षात असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी कारमधून पोलिसांना तब्बल पाच किलोमीटर पाठलाग करावा लागला.

स्वप्नील बाबूराव साळवे (वय २९), नीरज रवी पटारे (वय १९), रितेश सुरेश शेंडगे (सर्व रा. शाहूनगर, केडगाव, नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रीतम ऊर्फ पेप्या सावंत (रा. मोहिनीनगर, केडगाव, नगर) हा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Ahmednagar News
Sambhaji Nagar: पूल गेला वाहून, कुणीही ना आले धावून

कायनेटिक चौकात बारामतीला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबलेल्या चार कामगारांना आरोपींनी मारहाण करून लुटले होते. मंगळवारी (ता. २९) मध्यरात्री पवन सुरेश पैठणे, किरण रामेश्वर गोफणे, अजय लक्ष्मण गोफणे, गोविंद दादाराव गोफणे हे बारामती येथे जाण्यासाठी कायनेटिक चौकात वाहनाची वाट पाहत थांबले होते.

मध्यरात्री अडीचच्या सुमारास तेथे रिक्षामधून सहा जण आले. त्यांनी या चौघांना मारहाण केली. त्यांच्याकडील मोबाईल, गळ्यातील चेन, रोख रक्कम असा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतला. आरोपींनी कोयत्याने हातपाय तोडण्याची धमकीदेखील दिली. त्यानंतर रिक्षातून त्यांनी पोबारा केला.

Ahmednagar News
Satara : महापुरुषांची बदनामी करण्‍याचं धाडस होतंच कसं? अशा अपप्रवृत्ती ठेचल्‍याच पाहिजेत; उदयनराजेंचा कोणाला इशारा?

याप्रकरणी पवन सुरेश पैठणे (रा. तपोवन गोंधण, ता. जाफराबाद, जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी पळून जाणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अशोक सरोदे, याकूब सय्यद, तानाजी पवार, सोमनाथ मुरकुटे, प्रशांत बोरुडे, मधुकर चव्हाण, सत्यम शिंदे, योगेश ठोंबे, मुर्तुजा सय्यद आदींनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com