esakal | कांदा मिळत नसल्याने गहु, हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल
sakal

बोलून बातमी शोधा

Story of Agriculture Department in Parner taluka

रब्बी हंगामात यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पैसा देणाऱ्या पीकांच्या लागवडीकडे शेतकरी अधिक प्रमाणात वळले आहेत.

कांदा मिळत नसल्याने गहु, हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

sakal_logo
By
मार्तंडराव बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : रब्बी हंगामात यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पैसा देणाऱ्या पीकांच्या लागवडीकडे शेतकरी अधिक प्रमाणात वळले आहेत. त्यात कांदा गहू व हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र त्याचा परिणाम सुरूवातीस कांदा रोपे अती पाऊसाने खराब झाली त्यामुळे कांदा रोपे मिळेनात पुढे बियाणांचा सुद्धा तुटवडा निर्माण झाला होता.

आता गहू बियाणाची कृत्रीम टंचाई व्यापारी व कंपण्या करत आहेत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना चढ्या भावाने गहू बीयाणे खरेदी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. 

हेही वाचा : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतली मंत्री शंकरराव गडाख परीवाराची भेट
बऱ्याच वर्षानंतर तालुक्यात अतीशय मोठ्या प्रमाणात चांगला पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम यंदा शेतकरी खूष झाले होते. मात्र अती पाऊसामुळे अनेक ठिकाणी खारीपाची व अता रब्बीची पीके सुद्धा वाया गेली आहेत. नुकताच पाऊस काही दिवसांपासून उघडल्या नंतर शेतक-यांनी कांदा, गहू व हरभरा आदी उशीरा करता येणारी पीके घेण्याकडे वळले आहेत. 

मात्र सुरूवातीच्या काळात झालेल्या अती पाऊसामुळे कांदा रोपे खराब झाली त्या नंतर कांदा रोपे तयार करण्यासाठी कांदा बियाणे ही मिळेणात त्यात कांदा रोपे व बयाणांची टंचाई निर्माण झाल्याने त्यांची अवाजवी दराने व्यापा-यांनी विक्री केली.सुमारे एक हजारते दीड हजार रूपये किलो मिळाणारे कांदा बियाणे थेट चार हजार रूपये किलो दराने विकले जात आहे. तर काही ठिकाणी बोगस बियणेही विकली गेली आहेत.

Ahmednagar news update नगरमधील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अता मात्र पुन्हा तीच अवस्था गहू बियाणांची सुरू झाली आहे. तालुक्यात अणि जिल्ह्यातही गहू बियाणांची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. ठराविक वाण मिळेनासे झाले आहेत. महिकोचा 70-70 हा वाण अनेक व्यापा-यांनी सुमारे तीन ते चार महिण्यापुर्वी अनामत रकमा भरून बुकिंग केले होते मात्र त्यांना बुकिंगच्या पाच टक्के सुद्धा माल मिळाला नाही. तीच अवस्था माणिक्य सीडच्या सरबती वाणाची आहे असे अनेक वाण जे शेतक-यांना हवे आहेत ते सध्या मिळात नाही किंवा वाजवीपेक्षा अधिक किंमतीस घ्यावे लागत आहेत.

या पुर्वी पिशवीवर असलेल्या किंमतीपेक्षा शंभर ते दीडशे रूपये कमी दराने मिळाणारी गहू बियाणाची पिशवी अता त्यावर छापलेल्या किंमतीस किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीस घ्यावी लागत आहे. कंपणीव वितरकांनी जाणिवपुर्वक कमी बियाणे बाजारात अणली आहेत व कृत्रीम टंचाई निर्माण केली आहे. त्यामुळे शेतक-यांची लुबाडणुक होत आहे. 
चौकट-सध्या बहुतेक असणारे गव्हाचे वाण मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील अधिक प्रमाणात आहेत. मात्र ज्या वाणाला मागणी आहे त्या वाणाची टंचाई जाणवत आहे किंवा तो वाण मिळतच नाही. त्यामुळे शेतक-यांची अर्थिक लूट होत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image