अहमदनगर : अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची सक्तमजुरी

या खटल्यातील पीडित मुलगी फितूर झाली होती
अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची सक्तमजुरी
अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची सक्तमजुरीsakal
Updated on

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी दिलीप सखाराम दांगट (वय ५१, रा. कात्रड, ता. राहुरी) यास दोषी धरून १० वर्षे सक्तमजुरी व ११ हजार रुपये दंड, अशी शिक्षा जिल्हा न्यायाधीश माधुरी ए. बरालिया यांनी ठोठावली आहे.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील जी. के. मुसळे व मंगेश दिवाणे यांनी कामकाज पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांनी केला होता. या खटल्यातील पीडित मुलगी फितूर झाली होती, तसेच बचाव पक्षाने पीडित मुलीच्या भावाची साक्ष नोंदविली होती. त्यानेदेखील आरोपीच्या बाजूने साक्ष दिली होती. आमची आरोपीविरुद्ध काही एक तक्रार नाही, असे साक्षीदरम्यान न्यायालयास सांगितले होते.

दिलीप दांगट याने एका रात्री फिर्यादीच्या समक्ष पीडित मुलीवर अत्याचार केला. त्यास फिर्यादीने प्रतिकार केला असता दिलीपने फिर्यादी व तिच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी व गजाने मारहाण केली व घराबाहेर काढून दिले. फिर्यादीने वरील झालेल्या सर्व घटनेबाबत दांगटविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांनी केला व आरोपीविरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून हा निकाल दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com