अहमदनगर : अर्बन बॅंकेच्या विद्यमान संचालकांविरुद्धची याचिका फेटाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court

अहमदनगर : अर्बन बॅंकेच्या विद्यमान संचालकांविरुद्धची याचिका फेटाळली

अहमदनगर ः नगर अर्बन बॅंक बचाव समितीतर्फे सहकार पॅनलच्या विद्यमान आठ संचालकांच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही हरकत फेटाळली. त्यानंतर या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एस. जी. मेहेर यांनी ही याचिका फेटाळली आहे.

बॅंक बचाव कृती समितीतर्फे अजय बोरा, अनिल कोठारी, राजेंद्र अग्रवाल, शैलेश मुनोत, अशोक कटारिया, दिनेश कटारिया, दीपक गांधी व मनेश साठे यांच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हरकत फेटाळली.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात बॅंक बचाव कृती समितीतर्फे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल केल्यामुळे त्यावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळली आहे.

हेही वाचा: कोरोनाबाबत माहिती न देणं पडलं महाग; 'ॲमझॉन'ला पाच लाखांचा दंड

ही याचिका फेटाळल्यामुळे नगर अर्बन बॅंकेचे विद्यमान संचालक अजय बोरा, अनिल कोठारी, राजेंद्र अग्रवाल, शैलेश मुनोत, अशोक कटारिया, दिनेश कटारिया, दीपक गांधी व मनेश साठे आदींचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आठ उमेदवारांतर्फे ॲड. राहुल जामदार, ॲड. मझर जहागीरदार, ॲड. मयूर माळी यांनी काम पहिले.

"निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवलेला आहे. याचिकाकर्त्यांचे अपिल फेटाळले आहे."

- दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर

loading image
go to top