
अहिल्यानगर: गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी समाजकंटकांना हद्दपार केले जाणार आहे. तसेच या समाजकंटकांचे फ्लेक्स प्रमुख चौकांत लावण्याचा धोरणात्मक निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात चारशे समाजकंटकांवर हद्दपारीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.