Ajit Pawar News : सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवा ; अजित पवार Ahmednagar politics continued situation arose whether democracy Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar News

Ajit Pawar News : सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवा ; अजित पवार

Ahmednagar News: देशात दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याने, लोकशाही टिकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जातिधर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम करत सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांची मस्ती येणाऱ्या निवडणुकीत उतरवा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

ॲड. प्रताप ढाकणे यांनी काढलेल्या जनसंवाद यात्रेच्या समारोपप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भगवानगड पाणीयोजनेच्या कामाचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर करण्यात आले.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार नीलेश लंके, शुभांगी पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, राहुल जगताप, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके, विनायक देशमुख, घनश्‍याम शेलार, बाळासाहेब नाहाटा, प्रा. शशिकांत गाडे, प्रभावती ढाकणे, संदीप वर्पे उपस्थित होते.

पवार म्हणाले, की शिवसेनेबाबतीत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय लोकांना पटला नाही. मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना स्थान मिळणार नाही, ते बंड करतील व सरकार पडेल, अशी भीती असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा आम्ही विधानसभा निवडणुकीत उद्‍ध्वस्त केला. पुन्हा निवडून येण्याची

शाश्वती नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यांच्याकडून घेतल्या जात नाहीत. राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यांत जात आहेत. शेतकरी इच्छामरण मागत असताना चहा, जाहिरात व परदेशवारीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही.

उलट, त्यांचे वीजजोड तोडण्याचा उद्योग चालू आहे. आम्ही विरोध केला तर यांना राग येतो. किती दिवस लोकांची दिशाभूल करणार आहात, असा सवाल करत, या तालुक्यात महत्त्वाच्या असलेल्या तीन पाणीयोजना आमच्या सरकारने मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक ॲड. ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी, केले. आभार शिवशंकर राजळे यांनी मानले.

वापरा अन् सोडून द्या, ही भाजपची नीती

सुषमा अंधारे म्हणाल्या, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे (कै.) गोपीनाथ मुंडे यांचे भाषण चालू असताना टिपणे काढायचे. मात्र, त्यांनीच आता पंकजा मुंडे यांना बाजूला सारले आहे. वापरायचे व सोडून द्यायचे, ही भाजपची नीती आहे.

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्या बाबतीत हे करण्यात आले. नगर-पाथर्डी रस्ता काचेसारखा गुळगुळीत असल्याने आपली गाडी घसरेल का, अशी मला भीती वाटत होती, असा टोलाही त्यांनी रस्त्याची परिस्थिती पाहता लगावला.