Ajit Pawar News: ५० खोके आणि नागालँड ओके? गुलाबराव पाटलांच्या कमेंटला अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar Angry Gulabrao Patil Ncp Supports Bjp Nagaland

Ajit Pawar: ५० खोके आणि नागालँड ओके? गुलाबराव पाटलांच्या कमेंटला अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

Ajit Pawar News: राष्ट्रवादी आणि भाजप नागालँडमध्ये एकत्र आले आहेत. विरोधात बसण्याऐवजी भाजपप्रणित सरकारला साथ देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे.

अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून खडाजंगी झाल्याचे पाहायाल मिळालं. (Ajit Pawar Angry Gulabrao Patil Ncp Supports Bjp Nagaland )

सभागृहात नेमकं काय घडलं?

या देशात आणि राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले अशी वक्तव्य टीव्हीत बघत आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपाच्या फक्त मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला आहे. म्हणजे बदलाचे वारे कसे वाहायला लागले आहेत.

नागालँडमध्येही ५० खोके, बिलकुल ओके असं काही झालंय का? एकीकडे इथे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून बसायचं असं चित्र निर्माण झालंय. ५० खोके आणि बिलकुल ओके, नागालँड ओके असं झालंय का? असा सवाल कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित केला.

गुलाबराव पाटलांच्या या प्रश्नावर अजित पवार भलतेच भडकले. मंत्रीमहोदयांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. गुलाबराव पाटलांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायला हवं असं नाहीये.

राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना. ही कुठली पद्धत काढली? तुमच्या हातात आहे ना? मग करा ना चौकशी. कारण नसताना कुणावरही कसलेही आरोप का करताय? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.

तसेच, नागालँडमधली परिस्थिती वेगळी आहे. तिथे सर्व पक्ष एकत्र मिळून सरकार स्थापन करतात अशी परंपरा आहे. भारतातला तो भाग भारतातच राहण्यासाठी भारतीय म्हणून निर्णय घेतला आहे. त्याची चर्चा इथे करून गैरसमज पसरवण्याचं काहीच कारण नाही, असं स्पष्टीकरणही पवार यांनी यावेळी दिलं.

टॅग्स :BjpAjit PawarNCP