Rahata Bus Stop: राहाता बसस्थानकाचा झाला कायापालट, माजी सैनिकाने पदरमोड करुन केला लाखोंचा खर्च

स्वच्छ स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, सेल्फी पॉईंट, फूलझाडांची लागवड, टापटीप अन् प्रत्येक बसस्थानकात थांबावी, यासाठी निरंतर प्रयत्न, शहराच्या बसस्थानकात हा असा बदल झाला आहे माजी सैनिक भानुदास गाडेकर यांच्या पुढाकारातून.
Ahmednagar
Ahmednagar Esakal

Rahata Bus Stop: स्वच्छ स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, सेल्फी पॉईंट, फूलझाडांची लागवड, टापटीप अन् प्रत्येक बसस्थानकात थांबावी, यासाठी निरंतर प्रयत्न, शहराच्या बसस्थानकात हा असा बदल झाला आहे माजी सैनिक भानुदास गाडेकर यांच्या पुढाकारातून.

गाडेकर यांनी बसस्थानकाच्या विकासासाठी पदरमोड करून लाखभर रुपये खर्च केले. गेल्या सहा महिन्यांपासून तेथे वेळ देत आहेत. वाहतूक नियंत्रक किरण राऊत, साई योग मंडळाचे डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे व त्यांच्या सहकारी स्वच्छतादुतांची त्यांना मोलाची साथ लाभते आहे. त्यांच्या प्रयत्नांतून ही किमया घडली आहे.

वर्षानुवर्षे अस्वच्छता आणि विविध समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या स्थानकाला अक्षरशः नवसंजीवनी मिळाली. रस्त्यावरून बसस्थानकाकडे आणि स्थानकातून रस्त्याकडे होणारी प्रवाशांची पळापळ थांबली. कारण आता नगर-कोपरगाव रस्त्यावरून जाणारी जवळपास प्रत्येक बसगाडी स्थानकात येऊ लागली. जे चालक त्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या विरोधात तक्रार नोंदविली जाते. त्यामुळे चालकांना देखील शिस्त लागली आहे. (Latest Marathi News)

मोडलेली बाके दुरुस्त करून त्यांना रंगरंगोटी करण्यात आली. स्वच्छतागृह चकाचक झाले. अशी स्वच्छ स्वच्छतागृहे अन्य बसस्थानकावर शोधूनही सापडणार नाहीत. डॉ. पानगव्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बसस्थानकाच्या समोरच्या बाजूला फूलझाडांची लागवड केली. स्त्रीरोगतज्ज्ञ दत्तात्रय कानडे यांच्या सहकार्यामुळे हिरकणी कक्ष तयार झाला.

Ahmednagar
Who is Sagar Thakur : एल्विशचा लाथाबुक्क्यांनी मार खाणारा 'मॅक्सटर्न' उर्फ 'सागर ठाकूर' आहे तरी कोण?

स्थानकाच्या दोन्ही बाजूला मोठे फलक लावण्यात आले. सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला. वाहतूक नियंत्रण किरण राऊत यांची गाडेकर यांच्या प्रयत्नांना साथ लाभते आहे. येणाऱ्या प्रवाशांना सदैव सौजन्याची वागणूक दिली जाते. त्यामुळे येथील वातावरण देखील सकारात्मक झाले आहे. (Latest Marathi News)

Ahmednagar
VIDEO: सैफ अली खानचा मुलगा श्वेता तिवारीच्या लेकीला करतोय डेट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com