VIDEO: सैफ अली खानचा मुलगा श्वेता तिवारीच्या लेकीला करतोय डेट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

Ibrahim ali khan And Palak Tiwari: पलक आणि इब्राहिम पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Ibrahim ali khan And Palak Tiwari
Ibrahim ali khan And Palak Tiwari Esakal

Ibrahim ali khan And Palak Tiwari: सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim ali khan) आणि श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. इब्राहिम हा गेल्या काही दिवसांपासून पलकसोबत विविध इव्हेंटमध्ये स्पॉट होत आहे. इब्राहिम आणि पलक हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चे देखील सोशल मीडियावर होत आहे. अशातच आता पलक आणि इब्राहिम पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

इब्राहिम आणि पलक पुन्हा एकत्र झाले स्पॉट

इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी शनिवारी एकत्र स्पॉट झाले. दोघेही मुंबईत एकत्र दिसले होते. यावेळी पलकनं ग्रे टॉप आणि ब्लॅक पँट असा लूक केला होता. तर इब्राहिम अली खानने ब्लॅक टी-शर्ट आणि डेनिम जीन्स असा लूक केला होता. दोघेही एकाच गाडीत बसलेले दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दिसले की, इब्राहिम हा पलकचा हात धरुन दिला गाडीत बसवतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इब्राहिम आणि पलक हे एकमेकांना डेट करत आहेत, असा अंदाज नेटकरी लावत आहे. पण इब्राहिम आणि पलक यांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून कोणतीही घोषणा केलेली नाही.

पाहा व्हिडीओ:

इब्राहिम बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री

इब्राहिम अली खान हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो करण जोहरच्या सरजमीन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात इब्राहिमने करणला असिस्ट केले होते. आता इब्राहिमच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Ibrahim ali khan And Palak Tiwari
Ibrahim Ali Khan: सैफचा मुलगा इब्राहिमच्या डेब्यू चित्रपटाच्या टायटलचा खुलासा, या तारखेपासून शूटिंग होणार सुरू

जाणून घ्या पलकबद्दल..

पलक तिवारीनं गेल्या वर्षी रिलीज झालेल्या सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून पदार्पण केले होते. तसेच तिच्या बिजली बिजली या गाण्यांला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पलक ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com