

श्रीगोंदे : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले माजी आमदार राहुल जगताप यांनी सोमवारी (ता.२) मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान, कुकडी साखर कारखान्यापुढील अडचणी सोडवण्यासाठी सत्तापक्षात जाणे गरजेचे असल्याने जगताप समर्थकांचा एक गट आग्रही आहे.