Ahmedanagar:...तर जामखेडचं नाव बदला! अहमदनगरच्या नामांतर प्रस्तावाला विरोध करणाऱ्या नेत्याची मागणी

समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबीद हुसैन यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवींच्या कार्याचा आम्हाला अभिमान व आदर आहे. त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी किंवा जामखेडला त्यांचे नाव देण्यात यावे.
Ahmednagar
Ahmednagar Esakal

Ahmednagar Rename Demand: ज्या शहर व जिल्ह्याला ५३४ वर्षांचा प्रदीर्घ असा इतिहास आहे. हे शहर जगात सर्वत्र प्रसिध्द आहे. त्याचा क्षणातच बेकायदेशीररित्या घाईघाईने नामांतराचा प्रस्ताव महापालिका सभागृह विसर्जित असताना एकट्या आयुक्तांनी कोणत्या अधिकाराच्या व कोणत्या कायद्यांतर्गत केला.

बेकायदेशीर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठवविला. हा लोकशाहीला काळिमा आहे. अचानक नामांतराचा प्रस्ताव पाठविणा-या आयुक्त पंकज जावळे व जिल्हा प्रशासनाचा समाजवादी पार्टीतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.

वास्तविक अहमदनगर शहारास ५३४ वर्षांचा जाज्वल्य इतिहास आहे. ज्याने हे शहर स्थापन केले त्याचेच नाव शहराला आहे. राज्यात औरंगाबाद, उस्मानाबाद या शहरांचे नामांतर अद्यापि उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसे असतांना आयुक्तांनी कोणाला खुश करण्यासाठी किंवा कोणाच्या दबावाखाली हा ठराव पारित केला, हे न उलगडणारे प्रश्न आहेत.

आयुक्तांच्या संशयास्पद कार्यपध्दतीचा समाजवादी पार्टी धिक्कार करीत आहे. मुळात आरक्षणाची वचनपुर्ती करू न शकल्याने एका समाजाची नाराजी दूर करण्यासाठी असे उपटसुंभ निर्णय जनतेवर लादले जात आहेत. खरे तर त्या समाजाला नामांतराचे गाजर दाखविण्यापेक्षा शासनाने संबंधित समाजाची अनेक वर्षांची प्रलंबित मागणीची पूर्तता करावी, त्यांना एस.टी. वर्गात समाविष्ट करावे ते समाज हिताचे ठरेल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (Latest Marathi News)

वास्तविक नामांतराच्या केंद्राच्या काही मार्गदर्शक सुचना आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख सूचना म्हणजे ‘ज्या शहाराच्या नावाला काही ऐतिहासिक वारसा असेल तर त्या ऐतिहासिक शहराचे नाव बदलता येणार नाही.’ अशी स्पष्ट सूचना आहे. तरीही आयुक्तांनी घाईने निर्णय घेतला. अहमदनगर या नावाला आतापर्यंत शहराचे आमदार, खासदार तसेच स्थानिक राजकीय पक्ष तसेच कोणत्याही नगरसेवकांचा विरोध नसतांनादेखिल नामांतराचा विषय रेटला जात आहे.

Ahmednagar
Spanish Travel Vlogger's Assault Case: अत्याचाराच्या घटनेनंतरही स्पॅनिश महिलेनं घेतली भारताची बाजू; टीकाकारांना उत्तर देताना म्हणाली, 'कोणताही देश...'

जामखेडचे नाव बदला...

समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबीद हुसैन यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवींच्या कार्याचा आम्हाला अभिमान व आदर आहे. त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी किंवा जामखेडला त्यांचे नाव देण्यात यावे. परंतु ५३४ वर्षांचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामांतर करू नये, ही मागणी ही करण्यात आली. अन्यथा या विरोधात कायदेशीर मार्गाने केले जाईल. वेळ प्रसंगी न्यायालयीन लढाईही लढू, असे आबीद हुसैन व शिष्टमंडळाने निवेदनात नमूद केले आहे.(Latest Marathi News)

Ahmednagar
Rahul Narwekar Mail Hack: विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक; नार्वेकरांच्या मेलवरून राज्यपालांना ई-मेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com