Shirdi Loksabha: शिर्डी मतदारसंघात यंदा कोणती लाट? २००९पासून फडकतोय शिवसेनेचा झेंडा

शिर्डी लोकसभेच्या जागेवर शिंदे गटाकडून खासदार सदाशिव लोखंडे, तर ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होण्याची शक्यता आहे.
Shirdi Loksabha
Shirdi Loksabha Esakal

Shirdi Loksabha Constituency: साखर सम्राटांचा बालेकिल्ला, असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघावर मागील तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. मात्र यावेळी दोन शकले झालेल्या शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील, अशी स्थिती आहे. शिंदे गटाकडून खासदार सदाशिव लोखंडे, तर ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

जागा वाटपात स्थान न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याचा इशारा यापूर्वीच दिला आहे. गेल्या तीन निवडणुकांपासून लाटेवर स्वार झालेला उमेदवार येथून विजयी होतो आहे.

शिर्डी मतदारसंघ हा पूर्वी माजी खासदार (कै.) बाळासाहेब विखे पाटलांचा बालेकिल्ला होता. २००९ साली हा मतदारसंघ राखीव झाला आणि राजकीय संदर्भ बदलले. गेल्या सलग तीन निवडणुकांपासून लाटेवर स्वार झालेला शिवसेनेचा उमेदवार येथून लोकसभेत जातो.

२००९ साली येथून आरपीआयचे नेते रामदास आठवले विरुद्ध शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत झाली. त्यावेळी ॲट्रॉसिटी हा मुद्दा केंद्रस्थानी आला आणि त्या लाटेवर वाकचौरे विजयी झाले. पुढच्या निवडणुकीत त्यांना कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करण्याची ऑफर दिली. ते काँग्रेसकडून उभे राहीले आणि मोदी लाट आली. या मतदारसंघाला नवखे असलेले शिवसेनेचे खासदार लोखंडे अवघ्या सतरा दिवसांत फारसा प्रचार न करता विजयी झाले. त्यापुढच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली.(Latest Marathi News)

त्यावेळचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपत आले. एवढेच नाही तर रामदास आठवले हे देखील भाजप सोबत गेले अन् केंद्रात मंत्री झाले. पाठोपाठ वाकचौरे देखील भाजपवासी झाले. मागील निवडणुकीत पुन्हा मोदी लाटेचा प्रभाव जाणवला. महसूलमंत्री विखे पाटील यांनी शेवटच्या दोन दिवसांत आपली यंत्रणा सक्रिय केली आणि लोखंडे येथून दुसऱ्यांदा लाटेवर स्वार होत खासदार झाले.

Shirdi Loksabha
Bhramari Pranayam Benefits : राग शांत करण्यासाठी लाभदायी आहे भ्रामरी प्राणायाम, जाणून घ्या करण्याची पद्धत आणि फायदे

या निवडणुकीच्या तोंडावर वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात गेले. या निवडणुकीत शिंदे गटाकडून लोखंडे आणि ठाकरे गटाकडून वाकचौरे यांचीच नावे चर्चेत आहेत. लोखंडे व वाकचौरे यांना पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवीला असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.

विधानसभा मतदारसंघ निहाय विचार केल्यास अकोल्यात आमदार किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड हे दोघेही महायुती समर्थक. शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटलांचे वर्चस्व, तर कोपरगावात आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे दोघेही महायुती समर्थक आहेत. संगमनेरात काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांचे, तर नेवाशात आमदार शंकरराव गडाख आणि श्रीरामपुरात आमदार लहू कानडे हे तीन महाविकास आघाडी समर्थक आमदार आहेत. त्यामुळे सामना बरोबरीचा आहे. विखे पाटलांची उत्तरेतील राजकीय शक्ती ही लोखंडे यांची जमेची बाजू आहे. (Latest Marathi News)

यांच्याही नावांची चर्चा

श्रीरामपूर येथील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मनसेकडून बाळा नांदगावकर, काँग्रेसकडून नेवासे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र वाघमारे, उत्कर्षा रूपवते, ठाकरे गटाकडून अशोक गायकवाड यांच्या नावाची चर्चा सध्या होत आहे.

Shirdi Loksabha
Pakistan Under Attack: पाकमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या नौसेना तळावर हल्ला; माजिद ब्रिगेडकडून भयानक गोळीबार, बॉम्बस्फोट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com