Ahmednagar : सीताफळाने शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा,पहिल्याच तोड्यात अस्‍वले यांनी घेतले साडेतीन लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न

एकेकाळी डाळिंब पिकातून समृद्धी मिळवल्यानंतर आता सीताफळातून प्रगतीची वाट धरली आहे
Ahmednagar news
Ahmednagar newsesakal

गणोरे : तालुक्यातील वीरगाव येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब नामदेव अस्वले यांच्या कुटुंबात ‌सीताफळाने चार वर्षांपासून गोडवा आणलाय. एकेकाळी डाळिंब पिकातून समृद्धी मिळवल्यानंतर आता सीताफळातून प्रगतीची वाट धरली आहे. सध्या सीताफळाची काढणी सुरू झाली असून, पहिल्याच तोड्यात साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांचा हा यशस्वी प्रयोग इतर फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.

शेतकरी बाळासाहेब अस्वले यांनी शेतीला नवा आयाम देण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून पीक घेत आले आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी सहा एकरांवर ‌‘एनएमके वन गोल्डन'' या वाणाच्या सीताफळाची माळरानावर लागवड केली. त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. दरवर्षी साधारण दीड लाख रुपयांचा खर्च करतात. यंदा देखील हंगाम यशस्वीरित्या काढण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले. त्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्यांनी अपार मेहनत घेतल्याने आज फळ काढणी सुरू झाली आहे. प्रतिकिलोला ६५ रुपयांचा दर मिळत असून, पहिल्याच तोड्यात सहा टन उत्पादन घेतले आहे.

Ahmednagar news
Health Care : फ्रीजमध्ये चुकूनही ठेऊ नका ‘ही’ फळे अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

अजूनही सुमारे वीस टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. एकेकाळी डाळिंबाचे आगार म्हणून वीरगाव परिसराची ओळख होती. परंतु, तेल्या रोगाने डाळिंब पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन पिकांना पसंती दिली आहे. यानुसारच शेतकरी बाळासाहेब अस्वले यांनी सीताफळाची लागवड केली. त्यातून डाळिंबाने जशी समृद्धी आणली तशीच सीताफळाने देखील गोडवा आणला आहे. त्यांचे हे नावीन्यपूर्ण प्रयोग कायमच इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.

Ahmednagar news
Health Care : आल्याचा जास्त वापर करणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या 'हे' दुष्परिणाम

डाळिंबाच्या तुलनेत सीताफळ पीक अत्यंत फायदेशीर आहे. एकदा लागवड केल्यानंतर साधारण तीस वर्षे हे झाड टिकते. रोग व कीड सगळ्यात कमी येत असल्याने फवारणी, खते व मजुरीचा खर्चही कमी लागतो. फक्त सरकारने यावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देणे आवश्यक आहे.

- बाळासाहेब अस्वले, सीताफळ उत्पादक, वीरगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com